घरगुती जाचाला कंटाळून तांबडेमळ्यातील एकाची आत्महत्या

प्रमोद दांगट,निरगुडसर

आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथे गुरुवार (दि.15) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवनाथ सखाराम तांबडे ( वय वर्ष 35, रा. तांबडेमळा ता. आंबेगाव जि. पुणे) यांनी घरघुती व प्रापंचिक त्रासाला कंटाळून आपल्या घरातच अँगलला दोरीच्या साह्याने फाशी घेत आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.

याबाबत त्याच्या चुलत भाऊ याने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.

Previous articleथोरांदळे येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
Next articleनऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू