थोरांदळे येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

Ad 1

प्रमोद दांगट

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या थोरांदळे (ता.आंबेगाव) च्या हद्दीत हॉटेल सूर्या गार्डनच्या बाजूला अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या अमोल मारुती अरगडे या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल आर.बी.डांगे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार  (दि .१५ ) रोजी अमोल मारुती अरगडे (वय  २१, रा.भराडी ता. आंबेगाव जिल्हा पुणे )हा हॉटेल सूर्या गार्डन च्या आडोशाला अवैधरित्या विदेशी दारुची विक्री करत असल्याची माहिती मंचर पोलिसांना कळाली होती. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अमोल आरगडे हा त्या ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री करत होता याबाबत पोलिसांनी त्याला अटक केली असून त्यांचेकडून ६ हजार ४६९ रुपये किमतीची वेगवेगळ्या कंपनीची विदेशी दारू जप्त केली आहे.