दौंड तालुक्यातील रस्त्यावर जनतेसाठी राष्ट्रवादी रुग्णवाहिका धावणार

दिनेश पवार,दौंड

दौंड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला अत्यावश्यक सुविधा लवकर प्राप्त व्हाव्यात यासाठी पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने राष्ट्रवादी रुग्णवाहिका देण्यात आली आहे, या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते पुणे येथे संपन्न झाला.

यावेळी खासदार अमोल कोल्हे, पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे, अधिकारी वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते.

दौंड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला तत्काळ रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध होणार आहे,यामुळे सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध होण्यास मदत होईल,उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे मनःपूर्वक आभार
– वीरधवल जगदाळे(जिल्हा परिषद सदस्य पुणे)

Previous articleटेम्पोंत भाजीपाल्याखाली लपवून ठेवलेले १३८० किलो मांस जप्त
Next articleथोरांदळे येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई