टेम्पोंत भाजीपाल्याखाली लपवून ठेवलेले १३८० किलो मांस जप्त

नारायणगाव (किरण वाजगे)

आळेफाटा (ता.जुन्नर) येथे शुक्रवार (दि. १५) रोजी  आळेफाटा पोलिसांनी कारवाई करत सुमारे १३८० किलो मांस जप्त केले. पोलीस निरीक्षक टीवाय मुजावर यांनी केलेल्या या कारवाईमध्ये सुमारे चौ-याऐंशी हजार रूपयांचे मांस जप्त केले आहे. पोलिसांनी केलेल्या या दबंग कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या  माहितीनुसार आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत आळेफाटा पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर आणि त्यांचे सहकारी यांची रात्रीची गस्ती सुरु होती या दरम्यान रात्रीच्या सुमारास संगमनेरहून कल्याण बाजूकडे भाजीपाला घेऊन जाणारा टेम्पो क्रमांक एम एच ०४ के. एफ. ०८८२ हा आळेफाटा चौकात अडवून तपासणी केली असता या टेम्पो मध्ये पाठीमागील बाजूस भाजी पाल्याखाली १३८० किलो मांस अवैधरीत्या वाहतूक करत असताना मिळून आले.

यावेळी तात्काळ हे मांस व टेम्पो जप्त करण्यात आला असून सदर मांस वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण हत्या अधिनियम कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पकडलेले मांस गोमांस असण्याची शक्यता आहे.

आळेफाटा पोलिसांनी दोनच दिवसांपूर्वी पिंपळवंडी स्टँड या ठिकाणी अवैध दारु अड्ड्यावर छापा टाकून देशी व विदेशी दारु असा एकूण सुमारे पावणेदोन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर आळेफाटा पोलिसांनी पुन्हा ही कारवाई केल्यामुळे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर व आळेफाटा पोलिसांचे कौतुक होत आहे.

Previous articleमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleदौंड तालुक्यातील रस्त्यावर जनतेसाठी राष्ट्रवादी रुग्णवाहिका धावणार