रोपवाटिकेत मजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन

सोरतापवाडी येथे हरितगृह रोपवाटिका मध्ये काम करणाऱ्या मजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यात आले. थेऊर येथे तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर व पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले तर सोरतापवाडी येथे उपविभागीय कृषी अधिकारी सुनील खैरनार यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम आत्मा योजनेचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी रोपवाटिकेमध्ये होणारे कीड व रोगामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र राहुरी येथील कलाने, विषय विशेषज्ञ यांनी थेऊर येथे तर यशवंत जगदाळे, विषय विशेषज्ञ यांनी सोरताप वाडी येथे हरितगृह पिकांचे संगोपन व काळजी घेण्याबद्दल सखोल माहिती दिली.

थेऊर येथील कृषी मित्र नंदकुमार कुंजीर, प्रगतिशील शेतकरी विजय कुंजीर इत्यादी शेतकऱ्यांनी सुधा कार्यक्रमाला हजेरी लावली तर सोरताप वाडी येथील कार्यक्रमाला कृषी मित्र सुनील चौधरी तसेच प्रगतिशील शेतकरी अमित चौधरी, प्रवीण चौधरी, अमर पांगारकर, सचिन चौधरी, किशोर चोरघे इत्यादी उपस्थित होते. गुलाब कडलग, मंडळ कृषी अधिकारी हडपसर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व अहिल्या बाई होळकर रोपवाटिका योजना, वीकेल ते पिकेल योजनेची माहिती दिली. आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक महेश सुरडकर यांनी केले. आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक रेशमा शिंदे मॅडम व कांचन जाधव यांनी नियोजन केले.

यावेळी कृषी पर्यवेक्षक आर एस डावखर, कृषी पर्यवेक्षक गिरमकर, कृषी सहाय्यक राजेंद्र भोसेकर, कृषी सहाय्यक पुष्पा जाधव, कृषी सहाय्यक ज्योती हिरवे, कृषी सहाय्यक शंकर चव्हाण, कृषी सहाय्यक मुक्ता गर्जे, कृषी सहाय्यक अमित साळुंखे, कृषी सहाय्यक गुरुप्रसाद सोनटक्के हे उपस्थित होते.

Previous articleखासदार सुप्रिया सुळे यांनी सणसरला भेट देऊन नुकसानीची केली पाहणी
Next articleमहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – उपमुख्यमंत्री अजित पवार