पोदार इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांच्या फी साठी पालकांना त्रास देऊ नये अन्यथा आंदोलन केले जाईल – रूपालीताई राक्षे

Ad 1

चाकण-पोदार इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांच्या फी साठी पालकांना त्रास देऊ नये तसेच शासनाच्या जीआर येत नाही तोपर्यंत व शाळा पूर्णपणे सुरू होत नाही तोपर्यंत शालेय फी माफ करावी अशी मागणी  छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य यांना छावा मराठा युवा महासंघाच्या  प्रदेशाध्यक्ष रूपालीताई राक्षे यांच्या वतीने देण्यात आले आहे.


पूर्ण देशभरात कोरोणा महामारीचे संकट असताना सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणीत सापडली आहे तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रातील खूप मोठा फटका बसल्याने त्याचा परिणाम इतर कंपन्यांवर पडला आहे.त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना आपल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरणे अवघड झाले आहे.असे सर्व असतानाही खेड तालुक्यातील पोदार इंटरनॅशनल स्कूल यांच्याकडून पालकांकडे वारंवार फी मागून पालकांना मानसिक त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे तसेच नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना दहावीत रजिस्ट्रेशन होणार नाही ही भीती दाखवून फी लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा सर्व प्रकार गंभीर असून शासनाचा जीआर येत नाही तोपर्यंत व सर्व शाळा सुरू होत नाही तो पर्यंत पोदार इंटरनॅशनल स्कुल ने फी माफ करावी व पालकांना त्रास देऊ नये अशी मागणी छावा मराठी युवा महासंघ यांच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन प्रदेशाध्यक्ष रूपालीताई राक्षे यांनी संबंधित स्कूलला दिले असून विद्यार्थ्यांची फी माफ न केल्यास व पालकांना त्रास दिल्यास पोदार इंटरनॅशनल स्कूलया विरोधात आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी छावा मराठा युवा महासंघ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी भाऊ केळकर व पालक वर्ग उपस्थित होते.