कनेरसर येथे “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी

Ad 1

राजगुरूनगर-महाराष्ट्र शासनाने कोविड १९ या महामारीवर मात करण्यासाठी १५ सप्टेंबर २०२० पासून संपूर्ण राज्यात माझे कुटूंब माझी जबाबदारी या योजने अंतर्गत आपल्या गावातील ग्रामपंचायत, आरोग्य विभाग यांच्या वतीने प्रत्येक नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला .या योजने अंतर्गत कनेरसर ग्रामपंचायत कार्यक्षेञात (दि. ९ ) रोजी आरोग्य तपासणी चे नियोजन करण्यात आले होते.


या तपासणी साठी कनेरसर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे व अंबिका विद्यालय कनेरसर येथील शिक्षक , आशा वर्कर ,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


या संपूर्ण तपासणी कामाचे उत्कृष्ट नियोजन कनेरसर केंद्राचे प्रेरणादायी केंद्रप्रमुख बाळासाहेब गावडे साहेेेब, कनेरसर आरोग्य उपकेंद्राच्या निवासी आरोग्य अधिकारी संजिवनी गौतम, कनेरसर ग्रामपंचायत चे ग्रामसेवक संतोष डफळ भाऊसाहेब यांनी केले.