गॕस सिलेंडर मधून गॕस चोरी करणारी टोळी जेरबंद

पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत लोणिकंद पोलिस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर पणे घरगुती गॕस सिलेंडर मधून गॕस काढून कमरशियल गॕस मध्ये भरुन चोरी करणाऱ्या टोळीला लोणिकंद पोलिसांनी छापा टाकून पकडले असून सहा जणांसह एजन्सी चालक,जागा मालक यांच्यावर पुरवठा निरीक्षक हवेली यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोदविण्यात आला आहे.

याबाबत लोणिंकद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गट न १५०६ मध्ये काही इसम गॕस सिलेंडर रिफिलींग करत आहेत.अशी माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी छापा टाकला असता काही इसम गॕस सिलेंडर रिफिलींग करताना आढळून आले,याबाबत लोणिकंद पोलिसांना सदर बाब तहशिलदार हवेली,पुरवठा आधिकारी हवेली यांना माहिती दिली.त्यांनी नियुक्त केलेले पुरवठा निरीक्षक हवेली,मंडलअधिकारी वाघोली, तलाठी लोणिकंद, यांना बरोबर घेउन गट क्र १५०६ मधील एम.एम चौधरी यांच्या मालकीच्या गोडावून मध्ये सहा इसम प्रत्येकी भरलेल्या गॕस सिलेडंरमधून एक ते दीड किलो गॕस काढून दुसऱ्या गॕस सिलेंडर मध्ये भरताना आढळून आले.त्यांना लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची नावे सुनिल जगाराम विष्णोई( वय २२),राजेश सैराम बिष्णोई (वय २७),कैलास बाबुराम बिष्णोई (वय २४),गोपाल बाबुराम बिष्णोई (वय२३),श्रावण खमूराम बिष्णोई (वय२९),कैलास बिरबलराम बिष्णोई (वय२० सध्या रा.वाघो)ली अशी आहेत .

हे सर्व सुमित शिंदे यांच्या भारत गॕस कं एजन्सी वाघोली प्रियांकानगरी येथील गोडावून मधून त्याच्या कडील टाटा कंपनीच्या ४०७ टेम्पो MH12GT9456 ,अॕपे पॕगो MH12KP 8246, MH12LT0049,MH12LT2532,MH12KP7690 या वाहनामध्ये भरलेले सिलेंडर घेउन जावून गट नं १५०६ मधील चौधरी यांच्या जागेत नेउन गॕस चोरी करत असत.त्यांच्या कडून १९४ गॕसने भरलेले सिलेंडर,२७ रिकामे सिलेंडर,३ डिजीटल वजन काटे,चार लोखंडी पाइप,सह चार अॕप्पे पॕगो टेम्पो सह एक ४०७ टेम्पो असा एकूण १३,५८०७६ रु.किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अनेक दिवसापासून वाघोली परिसरात घरगुती गॕस कमी येत असल्याबाबत तक्रारी येत होत्या .या कारवाई मुळे गॕस चोरीची मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवेलीच्या DYSP सई भोरे पाटील , तहशिलदार सुनिल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,महसुल नायब तहाशिलदार संजय भोसले,पुरवठा निरीक्षक चनबस गवंडी,वाघोली मंडलधिकारी किशोर शिंगोटे,लोणिकंद तलाठी गणेश ससाणे,सहा पोलिसनिरीक्षक नितीन अतकरे यांच्या सह लोणिकंद पोलिसांनी केली आहे.

Previous articleआळेफाटा पोलिसांची जोरदार कारवाई १ लाख ४४ हजार रुपयांचा अवैध दारू जप्त:-तिघांवर गुन्हा दाखल
Next articleहवेली तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने उरूळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर,नर्स, कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप