आळेफाटा पोलिसांची जोरदार कारवाई १ लाख ४४ हजार रुपयांचा अवैध दारू जप्त:-तिघांवर गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे):-

  आळेफाटा पोलिसांनी दबंग कारवाई करत पिंपळवंडी (ता.जुन्नर) गावच्या बस स्टॅन्ड परिसरामध्ये दोन ठिकाणी अवैध दारू साठ्यावर छापा टाकला आहे. या कारवाई मध्ये एका ठिकाणाहून ९२ हजार रुपयांचा तर दुसऱ्या ठिकाणाहून ५२ हजार रुपयांचा असा एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या साठ्यामध्ये ऑफिसर चॉईस, रॉयल स्टॅग, मॅकडॉल नंबर 1, इम्पेरियल ब्ल्यू, जी. एम., डॉक्टर ब्रांडी, डी. एस. पी. ब्लॅक, रॉयल चॅलेंज असे देशी-विदेशी दारू चे एकूण ४२ बॉक्स तसेच २५ हजार रुपयांचे साहित्य असा एकूण १ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याप्रमाणे एकूण ३ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी. वाय.मुजावर यांनी दिली.

  ही कामगिरी आळेफाटा पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, सहायक फौजदार सतीश घाडगे, पो.ना.नारायण बर्डे, पो.नाईक.नरेंद्र गोराणे, पो. शिपाई गोविंद केंद्रे, किशोर कोरडे, निलेश करे, दीपक गर्जे, मोहन आनंदगावकर, मुरूमकर,  वैद्य, सचिन डामसे, किशोर कुलकर्णी, महिला.पो.शिपाई ज्योती दहिफळे, वैद्य, तडवी, मुरूमकर यांनी केली आहे.

Previous articleमहाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या पूर्व हवेली तालुकाध्यक्षपदी ह.भ.प चेतन महाराज माथेफोड यांची निवड
Next articleगॕस सिलेंडर मधून गॕस चोरी करणारी टोळी जेरबंद