ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना स्वसंरक्षणासाठी शिट्टी व काठीचे वाटप;लोणी काळभोर पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

स्थानिक तरुणांच्या मदतीने गावोगावी ग्रामसुरक्षा दल पोलीस पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आले आहे.

सध्या ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य रात्री बारा ते पहाटे पाच या दरम्यान वाड्या – वस्त्यांवर गस्त घालत असल्याने, चोरी, घरफोडी यासारखे गंभीर गुन्हे कमी होऊ लागले आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत ग्रामसुरक्षा दल स्थापन केल्यापासून ग्रामसुरक्षा दल हे रात्री गस्त घालत असल्यामुळे चोऱ्यांना आळा बसला असून कोणतेही गंभीर गुन्हे घडले नाहीत आपण आपनास वाटप केलेल्या शिट्टीचा जास्तीत जास्त वापर करुन लाठीचा फक्त स्वसंरक्षणासाठी वापर करावा असे उपस्थित सर्व ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर आवाहन केले.

उरुळी कांचन पोलीस चौकी येथे उरुळी कांचन, सोरतापवाडी, शिंदवणे, वळती, भवरापूर, कोरेगाव मूळ, खामगावटेक – टिळेकरवाडी येथील अहोरात्र गावात गस्त करणाऱ्या ग्रामसुरक्षा दलातील सुरक्षा रक्षक यांना त्यांचे मनोबल वाढावे यासाठी लाठी, शिट्टीचे वाटप लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, सचिन पवार, संदीप पवार, सोमनाथ चितारे, रुपेश भगत, पोलीस पाटील वर्षा कड, पोपट महाडिक, विजय टिळेकर, मोहन कुंजीर, चंद्रकांत टिळेकर, बापुसाहेब लाड आदी पोलीस कर्मचारी ग्रामसुरक्षा दलातील कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते.

जाहिरात