हवेली तालुका पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी राजेंद्र काळभोर

अमोल भोसले,उरुळी कांचन

पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न हवेली तालुका पत्रकार संघाची आज द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. ११ ऑक्टोबर २०२० ते १० ऑक्टोबर २०२२ या दोन वर्षाच्या मुदतीसाठी घेण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठी प्रत्येकी एक असे नऊच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल वाळुंज यांनी जाहीर केले, यासाठी प्रभाकर क्षिरसागर यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले.

नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे अध्यक्ष राजेंद्र काळभोर, उपाध्यक्ष जयदीप जाधव, सरचिटणीस अमोल अडागळे, कोषाध्यक्ष जितेंद्र आव्हाळे तर कार्यकारिणी सदस्यपदी गायत्री भंडारी, रियाझ शेख, चंद्रकांत दुंडे, सचिन सुंबे यांची बिनविरोध निवड झाली.

नवीन कार्यकारणीने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सुनिल लोणकर, राज्याचे मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांच्या नेतृत्वाखाली काम करु असा विश्वास व्यक्त केला. निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडण्यासाठी जिल्हा समन्वयक सुनिल जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleरूपाली राक्षे यांचा “मी भारतीय -कोविड योध्दा” राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारांने गौरव
Next articleमास्क घालून हल्ला करणाऱ्या सहा जणांना नारायणगाव पोलिसांनी केली अटक