संभाजी ब्रिगेड वतीने नायब तहसीलदार यांना निवेदन

Ad 1

राजगुरूनगर-मराठा समाजाच्या विशेष आर्थिक मागास प्रवर्गावर (एस ई बी सी) सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठेपर्यंत EWS आरक्षणाचा लाभ देण्यात यावा ,तसा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने तात्काळ काढावा ,अशी मागणी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली.तसेच राज्य शासनाने SEBC प्रवर्गाची स्थगिती उठविण्यासाठी एकमताने ठराव करून केंद्र सरकारला पाठवावा.पुनर्विचार याचिका दाखल करावी EWS आरक्षण लाभासाठी असणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा.त्यासाठी राज्यतील सर्वपक्षीय खासदारांनी केंद्राला निवेदन द्यावे.अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रसंगी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा सचिव विशाल जरे ,प्रवक्ते कैलास मुसळे,संभाजी ब्रिगेड खेड तालुका अध्यक्ष गणेश गारगोटे, उपाध्यक्ष दिपक बोंबले,कार्याध्यक्ष सोमनाथ बोत्रे,प्रसिद्धी प्रमुख दिपक मोरे उपस्थित होते.