रूपाली राक्षे यांची छावा मराठा युवा महासंघाच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

Ad 1

राजगुरूनगर- छावा मराठा युवा महासंघाच्या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी राक्षेवाडी (ता.खेड) सामाजिक कार्यकर्त्या रूपाली दादाभाऊ राक्षे यांची निवड करण्यात आली.छावा मराठा युवा महासंघ संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी राजेंद्र देवकर पाटील अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र,श्राजू पवार उपाध्यक्ष पुणे जिल्हा,शगणेश सरकटे संपर्क प्रमुख पुणे जिल्हा,निलेश जरे,प्रसाद वरकड,मयुर कोरडे,गणेश काळे, संभाजी भोर, विजय कांडगे,अंकुश दादा सावंत,रुपेश पाचरणे , अश्विनी कांबळे,सोनल कोरडे , अश्विनी भोर ,अनिकेत गोरे, मिलिंद जगदाळे उपस्थित होते.

मराठा आरक्षण , शिक्षणातील लुट ,वैद्यकीय लुट असे असंख्य प्रश्न आ वासुन उभे राहीले याविरोधात धनाजी येळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा मानस आहे. तसेच खेड तालुक्यांतील,जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील असंख्य प्रश्न आहेत ते संघटनेच्यावतीने सोडवण्याचा निश्चित प्रकारे प्रयत्न करील असे रूपाली राक्षे यांनी सांगितले