पर्याय प्रतिष्ठान व रोटरी क्लबच्या वतीने तिफणवाडी महिलांना परसबागेसाठी मोफत बी बियाणे वाटप

Ad 1

राजगुरूनगर- पर्याय प्रतिष्ठान राजगुरुनगर,रोटरी क्लब राजगुरुनगर यांच्य वतीने ग्रामपंचायत  तिफणवाडी येथे महिलांना परसबागेसाठी मोफत सेंद्रिय बी बियाणा़चे सभापती भगवान पोखरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले

यावेळी अंकुश शेठ राक्षे सदस्य पं स.खेड,अजय जोशी गटविकास अधिकारी,वामनराव बाजारे अध्यक्ष पर्याय प्रतिष्ठान राजगुरुनगर,राहुलशेठ वाळुंज अध्यक्ष रोटरी क्लब राजगुरुनगर, दिपक कडलग सरपंच,दिलीप कडलग उपसरपंच,ग्रा.प.सदस्य सुरेश कडलग,रामेश्वरी कडलग, ग्रामसेवक ज्ञानेश्वर पावडे,कृषी सहाय्यक दिगंबर डोलारे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

पर्याय प्रतिष्ठानच्या वतीने तालुकास्तरीय उत्कृष्ट परसबाग स्पर्धा व गावागावात घनघचरा व सांडपाणी व्यवस्थापन कार्यक्रम लोकसभातून घेणार येण्यात असल्याचे वामन बाजारे यांनी सांगितले.