चिथावणीखोर व्यक्तव्य करणाऱ्या ॲड.गुणरत्न सदावर्ते व प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची खेड तालुका छावा संघटना व सकल मराठा समाजाची मागणी

राजगुरूनगर-न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभर मराठी आरक्षण लागू व्हावी यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन सुरू असताना दि.९ ऑक्टो रोजी ॲड.गुणरत्न सदावर्ते व प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मिडियावर छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या विषयी अपशब्द वापरत मराठा व इतर समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे. त्यांचा या वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा बिघडला आहे.तसेच मराठा समाजाची अस्मीता असणारे छत्रपती घराण्याची बदनामी केल्यामुळे त्यांचा विरोधात राजगुरुनगर (खेड) पोलीस स्टेशन येथे भा.द.वी कलम १५३ अ ,ब , ४९९- ५००, ५०४ , ५०५ , ५०६ व २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व कठोर शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली.छावा संघटना खेड तालुका व सकल मराठा समाज च्या वतीने करण्यात आली असून या बाबतचे निवेदन खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरव साहेब यांना देण्यात आले.

उठ सुठ कोणीही येतो व प्रसिद्धी मिळवण्यासाठी छत्रपती घराण्याबद्दल व महापुषांबद्दल बोलतो त्यामुळे या पुढे अशी चिथावणी खोर व्यक्तव्य करणाऱ्यावर कठोर कारवाई व शासन करावे असे निवेदनात म्हंटले आहे.यावेळी निवेदन देण्यासाठी सोमनाथ ढोले, सौरभ दौंडकर, आकाश करंजेकर, धनंजय होले,कृष्णा लोमटे, कल्पेश येवले, यज्ञेश सुंबरे, वैभव सुंबरे, अतुल राऊत, विकास शिंदे, छावा संघटना महाराष्ट्र राज्यचे कार्यकर्ते व सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Previous articleभावडी येथे संडास मध्ये लपून ठेवली देशी विदेशी दारू पोलीसांनी केली जप्त
Next articleपर्याय प्रतिष्ठान व रोटरी क्लबच्या वतीने तिफणवाडी महिलांना परसबागेसाठी मोफत बी बियाणे वाटप