भावडी येथे संडास मध्ये लपून ठेवली देशी विदेशी दारू पोलीसांनी केली जप्त

प्रमोद दांगट

आंबेगाव तालुक्यातील भावडी येथे अवैध रित्या देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.ही दारू विक्री करण्यासाठी दारू विक्रेत्यांनी चक्क वॉकीटॉकी चा वापर केल्याचे समोर आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्यातील भावडी येथील हॉटेल मनोरंजन मध्ये अवैध दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत असून तेथील निलेश भगवान काळे व संतोष बबन काळे (रा.भावडी,ता.आंबेगाव जि.पुणे) हे वॉकीटॉकी च्या साह्याने कॉल देऊन ग्राहकांच्या दारू विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व मंचर पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना मिळाली असता त्यानुसार पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस हवालदार शंकर जम, शरद बांबळे, दिपक साबळे,मंचर पोलीस ठाण्याचे पो. ना. अजित मडके, विनोद गायकवाड,पो. शि. शिवाजी चितारी, एस. व्ही. गवारी यांच्या पथकाने छापा टाकला असता निलेश बबन काळे हा मागील दरवाजातून पळून गेला हॉटेलची पंचांसमक्ष झडती घेतली असता काऊंटर जवळ देशी-विदेशी दारू व एक वॉकीटॉकी संच आढळून आला आहे त्यानंतर चौकशी केली असता नीता निलेश काळे यांच्याकडे दुसरा वॉकी-टॉकी आढळून आला आहे, हॉटेलच्या मागील असणाऱ्या रुमची चावी उपलब्ध न झाल्याने पंचांसमक्ष रूम चे कुलूप तोडून रूमच्या संडास बाथरूम मध्ये देशी विदेशी दारू १,६९,९१० रुपयाची आढळून आली आहे, ४,०००रुपये किमतीचा वॉकी टॉकी संच असे एकूण १,७३,९१० रुपयांचा मुद्देमाल सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी जप्त केला आहे. याप्रकरणी निलेश भगवान काळे, संतोष बबन काळे ,व नीता निलेश काळे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो. स. ई. शिंदे करत आहे.

पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याने जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंद्यांवर छापे सत्र सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसापासून पुणे जिल्ह्यात अनेक अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहेत पुढील काळातही पोलिसांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.

Previous articleरिंगरोडची आखणी २५ किमी अंतरावर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
Next articleचिथावणीखोर व्यक्तव्य करणाऱ्या ॲड.गुणरत्न सदावर्ते व प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची खेड तालुका छावा संघटना व सकल मराठा समाजाची मागणी