काँग्रेसचे जेष्ठ नेते भिमाजीशेठ गडगे यांचे निधन

किरण वाजगे

नारायणगाव :- विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भिमाजीशेठ कमळू गडगे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य ,जुन्नर पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे माजी उपाध्यक्ष, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांचे ते खंदे समर्थक होते माजी आमदार वल्लभशेठ बेनके माजी खासदार स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर यांच्या बरोबरीने त्यांनी तालुक्यात कामे केली आहेत. त्यांच्या निधनाने वडगांव आनंद, आळेफाटा परिसरात शोककळा पसरली आहे.

Previous articleसुरेश गोरे यांना दौंड चे आमदार राहुल कुल यांनी वाहिली श्रद्धांजली
Next articleरिंगरोडची आखणी २५ किमी अंतरावर करण्याची शेतकऱ्यांची मागणी