सुरेश गोरे यांना दौंड चे आमदार राहुल कुल यांनी वाहिली श्रद्धांजली

सचिन आव्हाड

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश गोरे यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे . दौंड चे आमदार राहुल कुल यांनाही सुरेश गोरे यांच्या निधनाने दुःख झाले असून आमदार कुल यांनी सुरेश गोरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे .

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माझे सहकारी सुरेश गोरे यांचे आज कोरोनाशी लढताना दुःखद निधन झाले. गेले अनेक वर्षे त्यांचे आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांचे अचानक जाणे अतिशय वेदनादायक आहे.

आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला होता, पुणे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर आम्ही विधानसभेत एकत्रित आवाज उठवला होता. त्यांच्या रूपाने एक अत्यंत नम्र स्वभाव असलेल्या, गोरगरीब जनतेच्या समस्यांची जाणीव असणाऱ्या उमदया नेतृत्वास आज आपण मूकलो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो.. भावपूर्ण श्रद्धांजली..

अशा शब्दांत आमदार राहुल कुल यांनी माजी आमदार सुरेश गोरे यांना श्रद्धांजली वाहिली .

Previous articleशिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन
Next articleकाँग्रेसचे जेष्ठ नेते भिमाजीशेठ गडगे यांचे निधन