दौंड शुगरच्या 12 व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न

Ad 1

दिनेश पवार, दौंड

दौंड शुगरच्या 12 व्या गळीत हंगामाच्या निमित्ताने बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम पुणे जिल्हा परिषदचे सदस्य, दौंड शुगरचे संचालक वीरधवल बाबा जगदाळे व त्यांच्या पत्नी डॉ.संगीता वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते व बारामती टेक्सटाईल च्या अध्यक्षा सौ. सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

तसेच या 12 व्या हंगामात मोळी टाकण्याचा कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन जगदीश कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आला ,यावेळी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी,कारखान्याचे सर्व अधिकारी,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.