खेड तालुक्यातील शेकडो युवकांचा मनसेमध्ये प्रवेश

पुणे येथील मनसेच्या पक्ष कार्यालयात खेड तालुक्यातील शेकडो युवकांनी आज राजसाहेब ठाकरे व अमितसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन पक्षाचे नेते राजेंद्र वागस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका अध्यक्ष संदिपदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कामगार सेनेचे नेते नरेंद्रभाई तांबोळी,जिल्हा संघटक सुधिर भदे,अभय वाडेकर यांच्या उपस्थितीत मनसे मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

यावेळी शिरूर तालुकाध्यक्ष कैलासराव नरके, जिल्हा उपाध्यक्ष गणेश म्हस्के, चाकण शहर अध्यक्ष ऋषिकेश वाव्हाळ, आळंदी शहरअध्यक्ष अजय तापकीर, तालुका उपाध्यक्ष मनोज पडवळ ,शुभम स्वामी, संतोष काळे, वैभव काळे,कुणाल कोल्हापूरे,निलेश घुंडरे, प्रशांत बोराटे,तुषार नेटके,किरण नरके, सोशल मीडिया प्रमुख भरत बच्चे, विभाग अध्यक्ष संदिप शिंदे, नवनाथ देवकर,निलेश घुले, विशाल शेटे,अनिकेत बुचूडे,वैभव शिंदे,संतोष पवार,नितीन पवार, वैभव पवार,शेरू राजपुत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleएक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा टेक्निशियने केला विनयभंग
Next articleरुग्णालयांतील स्वच्छता, ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश