पुणे शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब तारे यांची निवड

Ad 1

अमोल भोसले पुणे

पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात सोशल डिस्टनशिंग ठेवून संपन्न झाली.

यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघ कार्यकारीणी विस्तार करण्यात आला. त्यामध्ये पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारीणी सदस्य दै.सकाळचे पत्रकार बाबासाहेब तारे यांची पुणे शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी
निवड कऱण्यात आली पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे संघटक दै.राष्ट्रवादीचे संपादक अजय कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

या बैठकीसाठी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे , पुणे जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष सुनील लोणकर, पुणे जिल्हा पत्रकार संघ समन्वयक सुनील जगताप, परिषद प्रतिनिधी पुणे एम. जी. शेलार, प्रसिद्धीप्रमुख सुनील वाळुंज, लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अँड.संजय पाटील , सरचिटणीस सतीश सांगळे, कोषाध्यक्ष मनोहर तावरे, कार्यकारीणी सदस्य अमित टाकळकर,दादाराव आढाव, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले, उपाध्यक्ष प्रविण शिर्के,माजी अध्यक्ष सायली कुलकर्णी , पत्रकार हल्लाविरोधी प्रमुख अनिल वाघमारे, दौंड तालुका पत्रकार संघ अध्यक्ष रमेश वत्रे, बारामती तालुका पत्रकार संघ अध्यक्ष हेमंत गडकरी , संघटक शहाजी तावरे, गोविंद तावरे , संदिप मोरे आदीसह पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

निवडीनंतर बाबासाहेब तारे म्हणाले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली, राज्य कार्याध्यक्ष शरद पाबळे, सचिव बापूसाहेब गोरे, जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाना सोबत घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. पुणे शहरात पत्रकार संघाची सदस्य नोंदणी वाढवून संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करणार आहे. पत्रकारांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत राहणार आहे.

Previous article गहाण असलेली जागा परस्पर विकून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Next articleपोलिस उपनिरीक्षकावर दरोड्याचा गुन्हा दाखल