गहाण असलेली जागा परस्पर विकून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाघोली-

वाघोली जवळील केसनंद येथील २० गुंठे जमीन व त्यावरील २३०० चौरस फुटाचे बांधकाम बँक ऑफ बडोदाकडे गहाण ठेवून ५५ लाख रुपये कर्ज घेतले असतानाही बँकेच्या परस्पर सदरची जागा विकून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसनंद येथील नामदेव लक्ष्मण हरगुडे व अनिता नामदेव हरगुडे( रा.केसनंद) यांनी २०१४ मध्ये गट नंबर १६४/१३ मधील २० गुंठे जागा व त्यावरील २३०० चौ फुटाचे बांधकाम बँक ऑफ बडोदाकडे गहाण ठेवून ५५ लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्ज न फेडल्याने जप्ती लिलाव करण्यासाठी सर्च घेतला असता दोघांनी ही जागा जयप्रकाश सुभाष सातव (रा.वाघोली) यांना ३० लाख रुपयांना २०१८ मध्ये विक्री केली असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आता बँकेची फसवणूक केली असल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणिकंद पोलिस करत आहे,

Previous articleनारायणगाव पोलीस स्टेशनची अवैध्य धंद्यांवर कारवाई
Next articleपुणे शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब तारे यांची निवड