नारायणगाव पोलीस स्टेशनची अवैध्य धंद्यांवर कारवाई

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)
नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील १० दिवसा मध्ये अवैध्य दारू, जुगार, मटका, गुटखा विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली त्यामध्ये एकूण १० गुन्ह्ये दाखल करण्यात आले असून त्यामध्ये ६९,०७७/ – रू किंमतीची अवैध्य देशी विदेशी ची दारू जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

या प्रकरणातील एकूण ६ आरोपीना येरवडा जेल मध्ये पाठवण्यात आले तर ४ आरोपीना न्यायालयाने जामीनावर सोडले आहे.
तर जुगार/ मटक्याच्या एकूण २ गुन्ह्यामध्ये ८२,२०० रुपयांचे मटका, जुगाराचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे.

नारायणगाव एस.टी स्टॅन्ड येथे अवैध्य गुटखा विक्री करणाऱ्या एका १७ वर्षे युवका कडून ५,००० रूपयांचा चा गुटखा व एक मोटारसायकल असा एकुण ३५,००० रूपयांचा चा माल हस्तगत करण्यात आला आहे.
असा सर्व गुन्हयामध्ये एकूण १,८६,२७७ / – रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैदय दारू, मटका, जुगार, गुटखा यांच्यावर यापुढे संबंधीत विभागाशी समन्वय साधुन कारवाई करण्यात येईल व ज्या आरोपीवर दोन व दोन पेक्षा जास्त गुन्हे असतील त्यांच्यावर अधिक सक्त कारवाई करण्यात येईल असे साहेब पोलीस निरीक्षक गुंड यांनी सांगितले.
वरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड व पोलीस कर्मचारी यांनी केली.