फेसबुकवर पत्नीच्या नावाने बनावट अकाउंट बनवून पतीने केली पत्नीची बदनामी

फेसबुकवर पत्नीच्या नावाने बनावट अकाउंट बनवून पतीने केली पत्नीची बदनामी

प्रमोद दांगट,निरगुडसर

संसारात वाद होत असल्याने नवऱ्याला सोडून आपल्या आई-वडिलांकडे राहत असल्याचा राग मनात धरून पतीने त्याच्या पत्नीचे फेसबुक’वर बनावट अकाउंट खोलून तिचे फेसबुक अकाउंट चालवून पत्नीची बदनामी केल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात पत्नीने आपल्या पती विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की जांभोरी (ता.आंबेगाव) येथील तरुणीचा 2014 मध्ये शिनोली तालुका आंबेगाव येथील साईनाथ यांच्याशी विवाह झाला होता मात्र लग्नानंतर 2 वर्षांनी त्याच्यात प्रापंचिक वाद होत असल्याने विवाहित महिला आपल्या मुलांना घेऊन वडिलांकडे जाभोंरी येथे राहत होती.

त्यानंतर दि 2/10/2020 रोजी फिर्यादी महिलेच्या भावाला त्याचे दाजी साईनाथ हे आपल्या बहिणीचा फोटो वापरून फेसबुक अकाउंट उघडून बहिणीची बदनामी व्हावी म्हणून संदीप नावाचे व्यक्तीबरोबर अश्लील व शिवीगाळ करणारी चॅटिंग करून त्याचे स्क्रीनशॉट काढून ते फेसबुक अकाउंट वर पोस्ट केले आहेत असे दिसले. त्यावेळी फिर्यादी महिलेच्या भावाने फोन करून मेसेज डिलीट करण्यासाठी सांगितले असता साईनाथ याने मी पोस्ट डिलीट करणार नाही सगळ्या गावाला पाहूदे तुझी बहीण व तुमची सगळ्या गावात बदनामी होउदे अशा प्रकारचा मेसेज पाठवला याबाबत फिर्यादी महिलेने सर्व खातरजमा करून त्या मेसेजची प्रिंट मारून आपल्या नवऱ्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात बनावट अकाऊंट उघडून बदनामी केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleखेड तालुक्यातील आळंदी शहरात असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
Next articleराजगुरूनगर मध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून