खेड तालुक्यातील आळंदी शहरात असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Ad 1

आळंदी-मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समिरभाऊ थिगळे यांच्या नेतृत्वाखाली आज खेड तालुक्यातील आळंदी शहरातील असंख्य कार्यकर्त्यांचा आळंदी शहरअध्यक्ष अजय तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश झाला.

यावेळी मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी, मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष मंगेशभाऊ सावंत,भोसरी विधानसभा विभाग अध्यक्ष अंकुश आप्पा तापकीर, खेड तालुका सचिव नितीन ताठे ,खेड तालुका उपाध्यक्ष सोपान डुंबरे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते