कोरोनाच्या संकटात जनतेसाठी उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मान

अमोल भोसले,उरुळी कांचन

जीवघेण्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्णांना आज मानसिक आधार देण्याची गरज आहे, प्रत्येकाच्या मनात आज कोरोना आजाराविषयी एक भयंकर भिती गेल्या सहा महिन्यांपासून बिंबवली गेली याच कारणास्तव अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, माणूस निश्चितच वाचला पाहिजे हीच गोष्ट मनी धरुन गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना आजाराविषयी राज्य सरकार, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, आशा वर्कर्स, पोलिस विभाग या सर्व यंत्रणेचे काम खरंच कौतुकास्पद आहे असे मत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व तेजस्विनी संस्थेच्या वतीने पत्रकार, साहित्यिक, कलावंत समाजातील विविध स्तरावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत असलेल्या व्यक्तीचा कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी हवेली तालुका पत्रकार संघाचे मानद सदस्य डॉ मोहन वाघ यांचे व्याख्यान संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे व तेजस्विनी संस्थेचे संस्थापक राजकुमार काळभोर, विश्वस्त अनिल खळदकर, संगीता काळभोर, वेणू शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाचे उदघाटन मुळशी विभाग महावितरण पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे , कवी जयंवत हापन उपस्थित होते. गृह विभागात वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, वैद्यकीय क्षेत्रात डॉ मोहन वाघ, सामाजिक पत्रकार क्षेत्रात गणेश सातव यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणा कंद यांनी केले तर आभार शुभांगी बनसोडे यांनी मानले

Previous articleखोडद येथील तलाठी सुनिल राणे याला एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
Next articleखेड तालुक्यातील आळंदी शहरात असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश