दौंड मध्ये मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आक्रोश आंदोलन

दिनेश पवार,दौंड

मराठा क्रांती मोर्चा दौंड शहर व तालुका यांच्यावतीने मराठा आरक्षण स्थगितीच्या निषेधार्थ व मराठा समाजाच्या इतर मागण्या त्वरित मान्य करण्यासाठी आक्रोश आंदोलन करण्यात आले दौंड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय ,राष्ट्रीय काँग्रेस कार्यालय चौफुला येथील शिवसेना कार्यालय खुटबाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय तसेच राहु येथील भाजप आमदार यांचे निवासस्थानी आक्रोश आंदोलन करण्यात येऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित होते ,सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षण स्थगिती मुळे मराठा समाज नाराज झाला असून,सरकारने लवकर या समाजाला न्याय मिळवून ध्यावा आशी मागणी मराठा समाजातून होत आहे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, नोकरीतील संधी यासाठी समाजाला वंचीत ठेवू नये यासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढून मराठा समाजाला न्याय मिळवून ध्यावा ही मागणी होत आहे,मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

Previous articleराजेगाव येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
Next articleखोडद येथील तलाठी सुनिल राणे याला एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले