Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिनेश पवार,दौंड
राजेगाव येथे प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्य समाज निर्माण संस्था वतीने मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजीत केले होते .या शिबिरात २४० रुग्णांची मोफत तपासणी झाली .१९ रुग्णांना डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी बुधराणी हॉस्पीटल पुणे येथे पाठविण्यात येणार आहे.

शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या लोंकाची कोवीड तपसणी नंतरच शस्त्रक्रिया होणार आहे . शस्त्रक्रियेसाठी नोंद झालेल्या रुग्णांची राहण्याची, जेवणाची व काळ्या चष्म्याची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. ४५ रुग्णांना १०० रुपये इतक्या वाजवी किंमतीत नंबर चे चष्मे दिले गेले . कोरोणाचा वाढता पार्दूभाव असल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याची सर्व काळजी घेवून शिबिरात तपासणी केली आहे.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे दोंड तालुका अध्यक्ष रमेश शितोळे,माजी उपसरपंच बबन कडू , राजेंद्र कदम तसेच प्रहारचे रामदास फाजगे आणि सुनिल जगताप व बुधराणी हॉस्पीटलचे डॉ .गिरीश पाटील , आप्पासाहेब काळे आणि वैभव गायकवाड उपस्थित होते .
ग्रामीण भागातील गोर गरीब गरजू रुग्णांना लाभ मिळावा यासाठी दर महिन्यांला दिव्य समाज निर्माण संस्था कार्यालय राजेगांव येथे शिबिर राबविण्यात येणार असे रमेश शितोळे यांनी सांगितले .
Download WordPress Themes Nulled and plugins.