दिवे घाटात १९ वर्षीय तरुणीचे अपहरण

अमोल भोसले,उरुळी कांचन

सी.ई.टी ची परीक्षा देऊन चुलत भावाबरोबर दुचाकी वरून पुरंदर तालुक्यातील आपल्या मुळ गावी परतत असलेल्या १९ वर्षीय तरूणीचे अपहरण झाले असल्याची घटना आज सकाळी ७: ३० वाजण्याच्या सुमारांस दिवे घाटात घडली आहे. सदर अपहरण एक दुचाकी व एक चारचाकी मधून आलेल्या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून केले असून यांतील एकजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

    सदर तरूणीच्या भावाने दिलेल्या फिर्यादी वरून अनिस पठाण व त्याचे दोन मित्र ( पुर्ण नाव पत्ता माहीत नाही ) यांचेविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सदर तरूणीचे मुळ गांव पुरंदर तालुक्यात असून तिचे वडील पुणे येथील एका शासकीय कंपनीत कामाला असल्याने ते पत्नी मुलगा व अपह्रत मुलगी यांचेसमवेत फुरसुंगी ( ता. हवेली ) परिसरातील एका गावात वास्तव्यास आहेत. सुमारे १ वर्षापुर्वी अनिस पठाण याने सदर तरुणीवर बळजबरीने बलात्कार केला होता. याबाबत त्याचेविरूध्द हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतरही पठाण हा तिचा वारंवार पाठलाग करून त्रास देत असल्याने सुमारे ४ महिनेपुर्वी चुलत भावाने तिला आपल्यासमवेत मुळ गावी नेले होते. तेथेही १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ – ३० वाजण्याच्या सुमारास सर्वजण घरी असताना पठाण व त्याचे मित्रांनी जावून सर्वांना मारहाण केली होती त्याबाबतही जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 अपह्रत तरूणीचे सी.ई.टी ची परीक्षा पुणे येथे असल्याने  चुलत भावाने तिला ३० सप्टेंबर रोजी तिचे वडीलांकडेे आणूूून सोडले होते. २ ऑक्टोबर रोजी तिने पेपर दिला व त्यानंतर आज शनिवार ( ३ ऑक्टोबर ) रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारांस बहीण – भाऊ  होंडा शाईन दुचाकी वरून त्यांचे मुळ गावी जाण्यासाठी हडपसर – सासवड रोडने निघाले. सकाळी ७ – ३० वाजण्याच्या सुमारांस दिवे घाटातील खालुन दुसरे वळणावरून सासवड बाजुकडे जात असताना मागून आलेल्या लाल रंगाचे स्वीफट कार क्रमांक एमएच.१२ सीवाय ७०५६ हीने दुचाकीस रोडचे कडेला दाबण्यास सुरूवात केली. दुचाकी रोडचे कडेला येताच चारचाकी चालकाने त्याची गाडी दुचाकीस आडवी मारली त्यामुळ दुचाकी थांबली. त्याचवेळी मागुन पल्सर मोटार सायकल एमएच १२ क्युएस ८१०८ यावरून दोन इसम आले त्यामध्ये अनिस पठाण हा होता त्यानंतर पठाण त्याचे दुचाकीवरून उतरला. त्याने त्याचे शर्टाचे मागील बाजुस लपवलेला कोयता काढुन उलट्या बाजुने भावाचे हातावर व पायावर मारला व बहीणीस बळजबरीने ओढु लागला त्यावेळी भाऊ त्यास थांबवण्याचा प्रयत्न करत असताना स्वीफ्ट मधुन एक इसम उतरला व त्यांने मारण्यास सुरूवात केली त्यामुळे तो बाजुला पडला त्यावेळी अनिस पठाण हा तु मध्ये पडु नको मला हिचेसोबतच लग्न करायचे आहे असे म्हणाला. त्यानंतर अनिस याने तरूणीस जबरदस्तीने त्याचे दुचाकीवर बसवले व हडपसर बाजूकडे निघुन गेला व त्याचे पाठोपाठ स्वीफट गाडी देखील हडपसर बाजुकडे निघुन गेली त्यानंतर त्याने झाले प्रकाराबाबत चुलते यांना कळवले व ऊरूळी देवाची दूरक्षेत्रात जावून तक्रार दाखल केली.

    घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सई भोरे – पाटील व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी घटना स्थळाला भेट दिली आहे.

Previous articleकुख्यात गुन्हेगार ज्वालासिंगच्या टोळीतील दोन अट्टल दरोडेखोरांना अटक
Next articleबौद्ध महासभेचे पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दुधावडे यांचे निधन