कोरोणा मुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करणार – खासदार डॉ.अमोल कोल्हे

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुका कोरोना आढावा बैठकीनंतर आज नारायणगाव येथे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सर्वांनी प्रशासनाला साथ देऊन कोविड विरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची असून यापुढे कोरोनामुळे वाढलेला मृत्युदर कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करायच्या आहेत. यासाठी आधुनिक सोई सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितले.

नारायणगाव येथील कुकडी धरण प्रकल्पाच्या विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर कोल्हे बोलत होते

याप्रसंगी आमदार अतुल बेनके, बाजार समितीचे सभापती संजय काळे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, जिल्हा परिषद गटनेते शरद लेंडे, विघ्नहर चे संचालक संतोष नाना खैरे तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी चंद्रशेखर माळी, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कोरोना बैठकीत झालेल्या विविध विषयांबाबत डॉक्टर कोल्हे यांनी वैद्यकीय अधिकारी तसेच प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली  व मार्गदर्शनपर सूचना केल्या.

नारायणगाव येथील बहुचर्चित गॅस पाईपलाईन बाबत काय म्हणालेत खासदार डॉ अमोल कोल्हे

नारायणगावातील अनधिकृत गॅस पाइपलाइनच्या खोदकामाची चौकशी करू

नारायणगाव येथील बहुचर्चित महेश गॅस एजन्सी करत असलेल्या गॅस पाईपलाईन च्या खोदकामाबाबत आता शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले.

यामध्ये वैयक्तिक स्वार्थासाठी जर कोणी नियम धाब्यावर बसवले असतील तसेच त्यामध्ये सर्वसामान्य करदात्यांचा जो निधी आहे त्याची जर उधळपट्टी झाली असेल तर त्याची मात्र सखोल चौकशी केली जाईल असे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितले.

Previous articleकास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन संपन्न
Next articleकुख्यात गुन्हेगार ज्वालासिंगच्या टोळीतील दोन अट्टल दरोडेखोरांना अटक