कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन संपन्न

दिनेश पवार,दौंड

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणित शिक्षक आघाडीचे धरणे आंदोलन बुधवार दिनांक 30 / 9 / 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे संपन्न झाले .धरणे आंदोलनाच्या मागण्याचे निवेदन डॉ .देशमुखसाहेब जिल्हाधिकारी पुणे यांना देण्यात आले .तसेच आमदार राहुलदादा कुल यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजून घेतल्या व शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले .आमदार कूल यांच्यासोबत सौ .शितलताई कटारिया नगराध्यक्षा दौंड ,श्री आनंद थोरात माजी उपाध्यक्ष भीमा पाटस कारखाना तसेच श्री योगेश कटारिया उपाध्यक्ष नागरीहित संरक्षण मंडळ हे उपस्थित होते .
पुढील प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे हे धरणे आंदोलन करण्यात आले .


माझे कुटुंब माझी जबाबदारी या आरोग्य सर्वेक्षणाचे काम शिक्षकांना देण्यात येऊ नये .
कालकथित सोपान कांबळे उपशिक्षक पंचायत समिती इंदापूर यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी व दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा .
शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस जबाबदार असणारे श्री .भगवान पवार जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे .

covid-19 च्या प्रादुर्भावाने मृत्युमुखी पडलेल्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना रुपये पन्नास लाख विमा रक्कम राज्य शासन व जिल्हा परिषद पुणे यांचेकडून तात्काळ देण्यात यावी .त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात यावी .
covid-19 मुळे मृत्युमुखी पडणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना देण्यात येणाऱ्या 50 लाख विमा सुरक्षा योजनेचा कालावधी वाढविण्यात यावा .
अनुसूचित जाती जमाती व इतर मागास (ओबीसी )एनटी, डीएनटी , व्हीजेएनटी व एसबीसी संवर्गातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना बढतीमध्ये आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून तात्काळ देण्यात यावे .
सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या केससाठी राज्य सरकारने तज्ञ वकिलांची नेमणूक लवकरात लवकर करावी .

मा . बच्चुभाऊ कडू शालेय शिक्षण राज्यमंत्री यांना झेड प्लस सुरक्षा पुरवून त्यांना धमकी देणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी .
डॉ .श्रीमंत कोकाटे प्रसिद्ध इतिहास तज्ञ व संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते यांनी धरणे आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व उपस्थितांना मार्गदर्शन केले .संघटनेच्या मागण्या सोडवण्यासाठी संघटनेसोबत कायम राहणार असल्याचे आश्वासन दिले अशी माहिती श्री गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक आघाडी यांनी दिली .

यावेळी संघटनेचे अतिरिक्त महासचिव श्री . गौतम मगरे ,श्री दादा डाळिंबे ,श्री चंद्रकांत सलवदे ,मिलिंद थोरात ,विठ्ठल सावंत ,बाळू लोंढे, नीलेश शिर्के, संदीप कदम ,सतीश कोळपे , अवधूत कांबळे ,कृष्णा काळेल ,आनंद बनसोडे ,दीपक कदम, दुर्योधन चव्हाण ,संतोष ससाने ,प्रशांत वाघमोडे ,संजय भोसले , विजय रणशृगारे, संतोष नामगुडे ,रवींद्र अहिवळे ,कन्हैया गौड . दिपक चापेकर, विकास रणदिवे ,राहुल वाघमारे , सतीश शिंदे ,विनोदकुमार भिसे , अतुल जेकटे ,दिलीप भालचीम , किशोर नदानिया , मिलिंद शिंदे हे पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleदेशातील नागरिक सक्षम बनवण्यासाठी प्राथमिक शिक्षण महत्वाचे – जि.प सदस्य वीरधवल जगदाळे
Next articleकोरोणा मुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करणार – खासदार डॉ.अमोल कोल्हे