बापूसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व मास्क वाटप

दिनेश पवार,दौंड

क्षत्रिय मराठा परिवाराचे प्रमुख संघटक,संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांचा वाढदिवस दौंड येथे वृक्षारोपण करून व परिसरातील व्यापारी,भाजीवाले, छोटे दुकानदार यांना मास्क वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला, संपूर्ण जिल्ह्यात क्षत्रिय मराठा परिवाराच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके वाटप,फळे वाटप,रुग्णांना आवश्यक साहित्य वाटप करून ठिकठिकाणी हा वाढदिवस साजरा करण्यात आला. वृक्षारोपण व मास्क वाटप बरोबर कोरोना जनजागृती विषयक प्रबोधन देखील करण्यात आले .


यावेळी पुणे जिल्हा प्रमुख, प्रदेश संघटक(प्रभारी)वैभव सयाजीराव पाटील,दौंड महिला प्रमुख सौ.मनीषा लोंढे, तालुका प्रमुख राहुल देशमुख, सोशल मीडिया प्रमुख प्रज्वल बांडे,मंथन मुटके, ओंकार पानसरे,तेजस साळुंखे, गणेश जगताप, प्रतीक लोंढे,शुभम जगदाळे, अथर्व साळुंखे, सुमित शिंदे आदी उपस्थित होते

Previous articleहोलेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सोनम होले यांची बिनविरोध निवड
Next articleचांडोली,चाकण,आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयांना आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून रुग्णवाहिकांचे लोकार्पण