होलेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सोनम होले यांची बिनविरोध निवड

राजगुरुनगर: होलेवाडी (ता खेड ) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सोनम श्रीकांत होले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

  उपसरपंच मनीषा विश्वनाथ होले यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त होते. या रिक्त जागेसाठी निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुरेखा संतोष होले यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य हजर होते. उपसरपंचपदासाठी सोनम होले यांचा एकमेव अर्ज आल्याने होले यांची बिनविरोध उपसरपंच पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले, निवृती होले, पोलिस पाटील संतोष होले, श्रीकांत होले, ग्रामसेवक बाबाजी चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांनी नुतन उपसरपंचाचे अभिनंदन केले. दरम्यान नवनिर्वाचित उपसरपंच सोनम होले यांच्या निवडीनंतर सत्कार करण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा प्रयत्न करणार आहे.

Previous article“माझे कुटुंब माझी जबाबदारी” अंतर्गत भांडगाव येथे कोविड १९ सर्वेक्षणाची सुरूवात
Next articleबापूसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व मास्क वाटप