“माझे कुटुंब माझी जबाबदारी” अंतर्गत भांडगाव येथे कोविड १९ सर्वेक्षणाची सुरूवात

सचिन आव्हाड

दौंड तालुक्यातील भांडगाव येथे आज माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत कोविड १९ सर्वेक्षणाची सुरूवात करण्यात आली आहे .

या कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती आशा शितोळे ,उपसभापती नितिन दोरगे,जि.प सदस्य गणेश कदम ,गटविकास अधिकारी अजिंक्य येळे ,नितिन शितोळे ,विस्तार अधिकारी ( पंचायत) तथा प्रशासक ग्रामपंचायत भांडगाव , बाबा मुलाणी ,पं स दौंड चे कक्ष अधिकारी अविनाश तिखे , उपसरपंच दत्तात्रय दोरगे,अंगणवाडी सुपरवायझर सुजाता तळपे,आरोग्य सेवक,आशा वर्कर ,अंगणवाडी कार्यकर्त्या प्राथमिक व माध्यमिक चे सर्व शिक्षक उपस्थित होते .

कोरोना महामारी च्या काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमा अंतर्गत दौंड तालुक्यातील गावांतील सर्व नागरिकांची टप्याटप्याटप्याने तपासणी करण्यात येत आहे . गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी या उपक्रमात करण्यात येत आहे . तालुक्यातील अनेक गावांची तपासणी आजवर करण्यात आली आहे .आज या उपक्रमाची सुरुवात भांडगाव येते करण्यात आली आहे .

मुख्यमंत्री यांनी करोनावर मात करण्यासाठी महत्त्वकांक्षी अशी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम दिनांक 15 सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केली आहे. मुख्यमंत्री यांनी सदर योजनेअंतर्गत सर्व स्तरावरील लोकप्रतिनिधी यांना मोहिमेच्या विविध टप्प्यामध्ये सहभागी होण्याबाबत विनंती केली आहे .त्यानुसार माननीय खासदार सुप्रियाताई सुळे व मा. आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या सहकार्य मार्गदर्शनानुसार दौंड तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती दौंड पंचायत समिती उपसभापती नितीन दोरगे यांनी दिली.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत आपल्याकडे आरोग्य तपासणी साठी येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य तालुक्यातील नागरिकांनी करावे . तसेच आजराची कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर त्वरित याबाबत माहिती आरोग्य विभागास द्यावी . सर्व नागरिकांच्या सहकार्याने कोरोना व्हायरस च्या विळख्यातुन बाहेर पडणे शक्य होणार आहे असे दौंड पंचायत समितीच्या सभापती आशा नितीन शितोळे यांनी सांगितले .

Previous articleसामाजिक उपक्रम राबवून नितीन वाव्हळ यांनी केला वाढदिवस साजरा
Next articleहोलेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सोनम होले यांची बिनविरोध निवड