सामाजिक उपक्रम राबवून नितीन वाव्हळ यांनी केला वाढदिवस साजरा

Ad 1

चाकण-कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर चाकण शहरातील नितीन सुभाष शेठ वाव्हळ यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा केला.

नितीन वाव्हळ यांनी वाढदिवसानिमित्त सरकारी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे वाटप केले. तसेच चाकण शहरांमध्ये हायपोक्लोराईड फवारणी केली तसेच गरजू कुटुंबांना किराणा किट वाटप ,वाफेचे मशीन वाटप व फूटपाथवर झोपणाऱ्या गरीब व गरजू लोकांना ब्लँकेटचे वाटप केले .या कार्यक्रम प्रसंगी मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते मंडळाच्या माध्यमातून पुढील काळातही असे उपक्रम राबवले जातील असे वाव्हळ यांनी सांगितले