बोरमलनाथ मंदिर येथे २५ कोरोना योध्द्यांचा सन्मान

सचिन आव्हाड

अखिल भारतीय मराठा महासंघ,पोलिस फ्रेन्डस वेलफेअर असो आणि मावळा संघटना यांच्या वतीने आज दौंड तालुक्यातील बोरमलनाथ मंदिर येथे २५ कोरोना योध्यांचा सन्मानपत्र व झाड देवुन सन्मान करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा मराठा महासंघाचे संघटक
सचिन हांडे ,कुराश असोसिएशन चे सचिव साळुंखे ,पोलिस फ्रेन्डस चे अध्यक्ष सचिन गुंड,मराठा मावळाचे पश्चिम महा.अध्यक्ष राहुल दोरगे,भारतीय जैन संघाचे मनोज पोखराणा तसेच पत्रकार प्रकाश शेलार ,बाळासाहेब मुळीक, सचिन आव्हाड ,रविंद्र खोरकर, विनय गुरव आदि पत्रकार उपस्थित होते.

कोरोना महामारी च्या काळात जनजीवन विस्कळीत झाले आहे . कोरोना व्हायरस संसर्गजन्य असल्याने माणूस माणसा पासून दुरावला आहे . अशा परिस्थितीत नागरिकांना जेवण व्यवस्था करणे , हॉस्पिटलमध्ये मदत करणं , औषधे उपलब्ध करून देणे , रक्त संकलन करणे ,आणि नागरिकांना अडचणीच्या काळात मदत केलेल्या 25 कोरोना योध्याचा सन्मान करण्यात आला .

यावेळी हर्षल भटेवरा राहु,प्रमोद पाटील कोल्हापूर,सचिन बोगावत इंदापूर,सुहास लोंढे मुंबई,रमेश राठोड दौंड,भगवान गुरव कोल्हापूर,रोहन सपकाळ लोणीकाळभोर,सायली धनाबाई पुणे,ऐश्वर्या मुनीश्वर कोल्हापूर, कल्पना जाधव बारामती,रोहन होले वानवडी,हरि रोडे ,नितिन हेंन्द्रे ,प्रकाश वरुडकर,प्रमोद उबाळे ,प्रसाद मुनोत दौंडशहर, जयेश ओसवाल दौंड,सौरभ भंडारी दौंड,धनराज मासाळ केडगाव,समीर पठाण नानगाव,स्वप्निल घोगरे कानगाव, कुंडलिक जाधव खेळगांव,जितेंद्र सातव चिंचवड,दिनेश गडधे उंडवडी,अविनाश ताकवले वैदुवाडी,मयुर सोळसकर, सचिनभाऊ हांडे यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन मराठा महासंघाचे पुणे जिल्हा सचिव मयुर सोळसकर ,विशाल कुंजीर , सुरज चोरगे,स्वप्निल घोगरे, अॕड.अजित दोरगे (अध्यक्ष मराठा महासंघ वकील आघाडी),राहुल शेळके,अतुल आखाडे,विशाल राजवडे,समीर लोहकरे,श्रीकांत जाधव,दत्तात्रय नागवडे,आप्पा दळवी,रोहित माने,सचिन उत्तेकर(बांदल),मंगेश गावडे यांनी केले होते.

Previous articleथकित एफ.आर.पी.ची रक्कम उस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची भाजपा किसान मोर्चाची मागणी
Next articleसामाजिक उपक्रम राबवून सुभाष वाव्हळ यांनी केला वाढदिवस साजरा