संतोषनगर येथे 2360 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

चाकण- “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या शासनाच्या योजनेअंतर्गत पिंपरी बुद्रुक आरोग्य उपकेंद्र यांचे मार्फत व ग्रामपंचायत संतोषनगर व पंचायत समिती खेड येथील शिक्षक यांचे मार्फत संतोषनगर गावातील 2360 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी (दि.29) रोजी करण्यात आली .

या तपासणी मध्ये कोरोणा संशयित 9 ग्रामस्थ सापडले मात्र त्यांची तपासणी केली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. या सर्वेक्षणात सर्व ग्रामस्थांनी मोलाची साथ दिली.उपसभापती सौ.ज्योती अरगडे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी अरुणाताई कड पाटील ,कांचन कड,मनीषा कड,सीमा कड,नितीन कड,अनिल कड,शांताराम कड ,स्वप्नील कड,ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.प्रमोद कड ,विद्या सातपुते ,आरोग्य विभागाचे डॉ. शिल्पा फावडे,डॉ.अमिता राजाध्यक्ष, डॉ.हर्षदा गतफने,डॉ.मेघा बुरे,डॉ.पवार. यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Previous article कोरेगावमुळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने उद्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या अभियानांतर्गत सर्वेक्षण
Next article“माझे गाव माझी जबाबदारी” या योजना अंतर्गत आव्हाट येथे घरोघरी आरोग्य तपासणी