कोरेगावमुळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने उद्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या अभियानांतर्गत सर्वेक्षण

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोरेगावमुळ (ता.हवेली) येथील आपल्या गावातून कोरोना महामारीचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागून शासन व प्रशासनाला मदत करुन सहकार्य करण्याचे आवाहन कोरेगावमुळ ग्रामपंचायतचे प्रशासक डी एच म्हेत्रे व ग्रामविकास आधिकारी संतोष गायकवाड यांनी केले.

उद्या गुरुवार दि.१/१०/२०२० रोजी सकाळी शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित राहुन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या सूचनेनुसार ”माझे कुटुंब माझी जबाबदारी” या अभियानांतर्गत सर्वेक्षण होणार असून आपण येणाऱ्या सर्व टिमला सहकार्य करण्याची गरज आहे व प्रत्येक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे असे पोलीस पाटील वर्षा कड यांनी सांगितले.