शिनोलीमध्ये १ लाख ७० हजारांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

Ad 1

प्रमोद दांगट,आंबेगाव

आंबेगाव तालुक्यातील शिणोली येथे दि ४/९/२०२० ते २४/९/२०२० या कार्यकाळात अज्ञात चोरट्याने उघड्या घरात शिरून बंद कपाटाचे लॉक खोलून कपाटातील सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले असल्याची घटना घडली आहे. याबाबत नलिनी शंकर बोऱ्हाडे यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नलिनी बोऱ्हाडे यांनी आपल्या कपाटात सोन्याचे दागिने ठेवले होते. कपाटाची एक चावी त्यांच्याकडे व दुसरी चावी मुलाकडे होती. त्यानंतर काही दिवसानंतर फिर्यादी यांची एक चावी हरवली असल्याने त्यांनी पैशाची गरज असल्याने आपल्या मुलाकडून (दि.२४)रोजी कपाटाची चावी घेतली तेव्हा कपाटातील सोन्याचे दागिने कपाटात नसल्याचे त्यांना दिसले. त्यांनी याबाबत आपल्या पती व मुलाला सांगितले असता त्यांनीही याबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगितले. त्यांनी दागिन्यांचा आजूबाजूला शोध घेतला असता दागिने सापडून आले नाही त्यांच्या कपाटातून ५०,०००/- रु अडीच तोळ्याचे मणी मंगळ सुत्र, ९०,०००/- रु सव्वा तीन तोळ्याची सोन्याची माळ , १५,०००/- रु अर्ध्या तोळ्याची सोन्याची चैन,१५,०००/- छोट मंगळसुत्र असा एकूण १,७०,०००/- रु. चे सोन्याचे दागीने अज्ञात चोरट्याने उघड्या घरामधुन कपाट कुठल्यातरी चावीने उघडुन चोरी करुन चोरुन नेले आहे.

यासंदर्भात नलीनी बोऱ्हाडे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास घोडेगाव पोलिस करत आहेत.

जाहिरात