दावडी ग्रामस्थांचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले एक लाख रुपये

Ad 1

राजगुरूनगर- जगभरात करोना या महामारीने थैमान मांडले असून या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.या प्रयत्नमध्ये खेड तालुक्यातील पूर्व भागातील  दावडी ग्रामस्थांनी खारीचा वाटा असावा या हेतूने दावडी गावातील काही तरुणांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने एक लाख रुपये जमा केले.

दावडीग्रामस्थांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली आरोग्यसाठी सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिली जात आहे,परंतु एक मदतीचा हात म्हूणन दावडी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत एक लाख रुपये जमा केले.ही रक्कम खेड तालुका तहसिल कार्यालय मध्ये नायब तहसीलदार राजेश कानसकर साहेब यांच्या कडे सुपूर्त केली.

यावेळी दावडी गावचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, पत्रकार सदाशिव आमराळे,मोशन किल्पचे डायरेक्टर बाबासो दिघे,उद्योजक संभाजी घारे, मा. उपसरपंच दुडे सैनिक दीपक मांजरे,शिवसेना अध्यक्ष संतोष सातपुतेव राहुल कदम उपस्थित होते.हा संपूर्ण उपक्रम पत्रकार सदाशिव आमराळे,बाबासाहेब दिघे यांनी राबविला.