“माझे गाव माझी जवाबदारी” या योजनेअंतर्गत दावडी गावात घरोघरी तपासणी

राजगुरूनगर- दावडी (ता.खेड) येथे “माझे गाव माझी जवाबदारी” या योजनेअंतर्गत नागरिकांची तपासणी करण्यात आले.यामध्ये २० संशयित तर चार जणांना बाधा झाल्याचे आढळून आले.

या मोहिमे मध्ये आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक असे ७० कर्मचाऱ्यांची २३ पथके होती.त्यांनी गावातील १०३६ कुटुंबाची आरोग्य तपासणी केली.

या मोहिमेचे उद्घाटन पंचायत समितीचे सदस्य वैशाली गव्हाणे यांच्या हस्ते झाले.

यावेळी पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, मा.सरपंच संतोष गव्हाणे, उद्योजक संभाजी घारे, शिवसेना नेते संतोष सातपुते, राहुल कदम,ग्रासेवक तानाजी इसवे,आरोग्य सेविका डॉक्टर भाग्यश्री पनाळ, दत्ता माजरे दत्तात्रय सातपुते, प्रकाश शिंदे, अशोक सातपुते,रमेश होरे,निलेश शिंदे, बंटी साबळे आदी उपस्थित होते.

Previous articleदावडीत बैलगाडा घाट ग्रामस्थांनीच खड्डे खोदून केला बंद
Next articleदावडी ग्रामस्थांचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले एक लाख रुपये