दावडीत बैलगाडा घाट ग्रामस्थांनीच खड्डे खोदून केला बंद

राजगुरूनगर- बैलगाडा शर्यतींना न्यायालयीन बंदी असल्यामुळे बैलगाडा शर्यती बंद झाल्या आहेत. मात्र ही बंदी झुगारुन दावडी येथील घाटात राजरोसपणे बैलगाडे पळविण्यात येत होते.त्यामुळे शेतक-यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने अखेर दावडी येथील घाट ग्रामस्थांनीच खड्डे खोदून बंद केला आहे

दावडीतील घाटालगत असणऱ्या आजुबाजुचे शेतकरी ,गाडगेवस्ती, नवीन गावठाण या परिसरातील संभाजी घारे, बंटी साबळे, सुधिर गाडगे, विकास गाडगे,बबन गाडगे यांच्या सह ग्रामस्थांनी पोलिस पाटील व ग्रामस्थांकडे घाट बंद करण्याची मागणी केली होती.

घाटा लगतच्या शेतकऱ्याच्या शेतातील पिकात बैलगाडा जात असल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत होती. या कारणाने शेतकरी त्रस्त झाले होते. तसेच गावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.तसेच बैलगाड्याचा सराव असल्यामुळे बाहेरील बैलगाडामालक व त्यांचे सहकारी दावडीत येत असल्यामुळे तसेच दावडी परिसरातील बैलगाडाशोकीन घाटात बैलगाडा पाहण्यासाठी जात असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता होती. हे लक्षात घेता दावडीचे माजी सरपंच संतोष गव्हाणे यांनी स्वतः बैलगाडा घाटात येऊन ट्रॅक्टरद्वारे खोदून काढला आहे.

बैलगाडा शर्यतीवरील न्यायालयीन बंदी हटवून बैलगाडा शर्यती सुरु झाल्या पाहिजे, अशी शेतकरी व बैलगाडामालक यांची मागणी आहे. यापुढे बैलगाडामालकांनी दावडी येथील घाटात बैलाचा सराव करण्यासाठी बैलगाडा घाटात आणू नये, – आत्माराम डुंबरे, (पोलीस पाटील, दावडी)

Previous articleपश्चिम बंगाल प्रमाणे महाराष्ट्रातही एक ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे व तमाशाला परवानगी मिळावी – लक्ष्मीकांत खाबिया
Next article“माझे गाव माझी जवाबदारी” या योजनेअंतर्गत दावडी गावात घरोघरी तपासणी