गुळाणी,वाकळवाडी,वाफगाव परिसरातील बटाटा व कांद्याचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

राजगुरूनगर- खेड तालुक्याच्या पूर्व भागातील,वाफगाव गुळाणी,वरूडे वाकळवाडी, चिंचबाईवाडी, जऊळके चौधरवाडी, गाडकवाडी या गावांमध्ये बटाटा काढणीचा हंगाम सुरू असतानाच संततधार पावसामुळे काढणीला आलेले बटाटे व नुकतेच लागवड केलेली कांदे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने परिसरातील शेतकरी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहेत.

पुर्व भागात मोठ्या प्रमाणात बटाटा पीक घेतात. या परिसरात सुमारे चार हजार ते साडेचार एकरावर बटाटा लागवड होते.मागील आठवड्यातील मुसळधार पाऊसामुळे आरणीत सडलेले बटाटा निघत आहे.अनेक शेतकऱ्यांना सर्वच बटाटे फेकून द्यावे लागले असून, पिकासाठी केलेला खर्चही वसूल होणार नसल्याचे शेतकरी मच्छिंद्र पिंगळे यांनी सांगितले.

पुर्व भागात संततधार पावसामुळे परिसरातील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पाऊसामुळे बटाटा,कांदे, कडधान्ये, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे सर्व मेहनत वाया गेली असून शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.महसूल व कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ,अशी मागणी गुळाणी येथील प्रयोगशील शेतकरी मच्छिंद्र पिंगळे राम मांजरे, अर्जुन रोडे, विठ्ठल ढेरंगे, एकनाथ ढेरंगे, दत्तात्रय कोरडे यांनी केली आहे

Previous articleरोहकलचे सरपंच अमृत ठोंबरे यांचा राजीनामा
Next articleपश्चिम बंगाल प्रमाणे महाराष्ट्रातही एक ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे व तमाशाला परवानगी मिळावी – लक्ष्मीकांत खाबिया