रोहकलचे सरपंच अमृत ठोंबरे यांचा राजीनामा

चाकण – रोहकल(ता.खेड) येथिल सरपंच अमृत सुरेश ठोंबरे यांनी आज आपल्या सरपंच पदाचा राजीनामा खेड पंचायत समितीच्या उपसभापती ज्योती अरगडे यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या चार वर्षांपूर्वी रोहकल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमृत ठोंबरे यांची निवड झाली होती. इतर सदस्यांना सरपंच होण्याची संधी मिळाली म्हणून त्यांनी स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा दिला.ठोंबरे यांनी राजीनामा दिल्याने रोहकल गावात सरपंच पदासाठी चुरस निर्माण झाली असून सरपंच पद मिळवण्यासाठी सध्या रस्सीखेच सुरु आहे.रोहकलचा सरपंच कोण होणार याकडे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अमृत ठोंबरे यांच्या कार्यकाळात रोहकल गावात अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, मंदिरासमोर पेव्हींग ब्लॉक बसविले, ग्रामपंचायत कार्यालयाचे काम सुरू आहे. दलितवस्ती हायमास्ट दिवा, लूमची टाकरवाडी, पूर्वाचीवाडी, गणपाचीवाडी या आदिवासी वस्त्यांमध्ये अंतर्गत रस्ते, जोड रस्ते, पिण्याच्या पाण्याची टाकी, तसेच १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेला साहित्य वाटप यासह १कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण झाली आहेत.तसेच कोरोनाच्या काळात ग्रामपंचायतच्या माध्यमातून सँनिटायझर,मास्क,गाव फवारणी, गोळ्या, औषधे यांचे वाटप केले

Previous articleग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांचा सन्मान
Next articleगुळाणी,वाकळवाडी,वाफगाव परिसरातील बटाटा व कांद्याचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी