ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांचा सन्मान

दिनेश पवार,दौंड

ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या 89 व्या जयंतीनिमित्त दौंडचे तहसीलदार संजय पाटील प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांचा उत्कृष्ट सेवा कार्यामुळे पुणे विभागीय अध्यक्ष अशोक अग्रवाल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला,बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांनी ग्राहकांचे हक्क,अधिकार,कर्तव्य याविषयी चर्चा केली,बिंदुमाधव जोशी यांनी 1974 मध्ये ग्राहकांच्या हितासाठी पुणे येथे ग्राहक पंचायत सुरू केली पुढे 1986 साली माजीपंतप्रधान राजीव गांधी यांनी यास राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली, सगळ्यांना रास्त भावात वस्तू मिळाव्यात असे असे नाना यांना वाटत असे यासाठी त्यांनी ग्राहक चळवळ चालवली पण कोणाचे दुकान फोडून किंवा नुकसान करून नाही,सर्वांना रास्त भाव मिळणे हा सर्वांचा अधिकार आहे आणि तो सर्वांना मिळावा यासाठी  प्रयत्न केले,आज दौंड मध्ये बिंदुमाधव जोशींच्या जयंतीनिमित्त दौंड मध्ये प्रशासकीय सेवेत ज्या अधिकाऱ्यांनी कोरोना प्रादुर्भावामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली,जनतेच्या सुरक्षेला ज्यांनी प्राधान्य दिले,अशा अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी ग्राहक पंचायत पुणे विभागीय अध्यक्ष अशोक अग्रवाल,ग्राहक संरक्षण समिती अशासकीय सदस्य पुणे-आ. न.पाठाण,दौंड ग्राहक पंचायत प्रवासी महासंघ चे अध्यक्ष-विलास मगर,ग्राहक पंचायत दौंड चे अध्यक्ष-अरुण जाधव,ग्राहक पंचायत सदस्य-सदाशिव रणदिवे, दिनेश पवार आदी उपस्थित होते.

Previous articleकास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघाचे पुणे येथे धरणे आंदोलन
Next articleरोहकलचे सरपंच अमृत ठोंबरे यांचा राजीनामा