ज्ञानगंगा शिक्षण मंडळाकडून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात स्तुत्य उपक्रम -जि.प.सदस्या कीर्ती कांचन

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिक्षकच खरे जीवनाचे शिल्पकार शिक्षकांनी दिले सर्वांगीण विकास साधणारे शिक्षण म्हणून आम्ही घडलो ते शिक्षकांच्या तळमळीच्या ज्ञानदानामुळे शिक्षकांचे संस्कार अभिनय क्षेत्रात ठरले मोलाचे आयुष्यात शिक्षकांचे ऋण फेडणे कठीणच असे मत जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती अमित कांचन यांनी व्यक्त केले.

समाजोपयोगी उपक्रमासाठी सोरतापेश्वर देवस्थान, लोणी पोलीस स्टेशन कर्मचारी, हवेली तालुका परिसरातील पत्रकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने समाजातील वंचित तरुणांना शिक्षणाच्या संदर्भात लागणारे साहित्य किटच्या माध्यमातून उपस्थितीत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, माजी उपसरपंच भाऊसाहेब तुपे, पश्चिम महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे भाजपचे अध्यक्ष विकास जगताप, भाजपचे शहर अध्यक्ष श्रीकांत कांचन, तुळशीराम घुसाळकर, सचिन सुंबे, चंद्रकांत दुंडे, नितीन करडे, राम भंडारी, ओंकार कांचन, पोलीस पाटील विजय टिळेकर, कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, माऊली लाड, जनाई डेव्हलपर्सचे संस्थापक अध्यक्ष सागर कांचन, मिलिंद कांचन, बापु लाड, नितीन जगताप आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या जागतिक संकटात सामान्य माणसाला आधार देण्यासाठी विविध स्तरावर मदत झाली पण लहान मुलांना शिक्षणाच्या संदर्भात कुठलीही अडचण येऊ नये या उद्देशानेच जिथे गरज आहे तिथे मदत करण्याचा मानस असल्याचे मत कार्यक्रमाचे आयोजक सचिन माथेफोड यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात मांडले.

कोरोनाच्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची गंगोत्री वाहत आहे परंतू गरीब होतकरू व गरजू मराठी व इतर माध्यमाच्या मुलांपर्यंत मात्र या गोष्टी पोहचत नाहीत. पालावर राहणारे, झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या पालकांना सध्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे सध्या दुर्लक्ष झाल्याने ही मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला जाऊ नये म्हणून ‘ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ’ या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली असून त्यांच्यासाठी शालेय वस्तू व पुढील सहा महिने पुरेल असा अभ्यासक्रम किट तयार करुन त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य करत आहेत. जेणेकरुन या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी व पालकांच्या डोक्यावरील काही भार हलका व्हावा व विध्यार्थी अभ्यासात रमावा. या कार्यामुळे परिसरात या संस्थेचे कौतुक होत असून समाजातील दानशूर लोक मदत करण्यासाठी पुढे येत आहे.
होतकरु गरजू विद्यार्थ्यांना मदत हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन उरुळी कांचन पाटील वस्ती राणमळा याठिकाणी विविध फुल नर्सरीमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Previous articleनारायणगाव येथे बालाजी ट्रॅक्टर शोरूमच्या मालकाने ग्राहकाला लोखंडी पाईपने केली बेदम मारहाण
Next articleबकोरीच्या डोंगरावर वृक्षारोपण,प्रबोधन करून वाढदिवस साजरा