नारायणगाव येथे बालाजी ट्रॅक्टर शोरूमच्या मालकाने ग्राहकाला लोखंडी पाईपने केली बेदम मारहाण

 नारायणगाव येथे पुणे नाशिक हायवेलगत असलेल्या बालाजी ट्रॅक्टर शोरूममध्ये ट्रॅक्टरचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी आलेल्या ग्राहकाला शोरूम मालकाने व त्याच्या भावाने मारहाण केली. तसेच सोबत आलेल्या नातेवाईकांना धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे दोघांना अटक केली आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

या बाबतची फिर्याद सिद्धार्थ सुरेश मंडलिक वय वर्षे २७ राहणार (बेलसर, ता. जुन्नर जिल्हा पुणे) यांनी दिली.
बालाजी ट्रॅक्टर शोरूमचे मालक संतोष भुजबळ व योगेश भुजबळ यांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि.२६/०९/२०२० रोजी दुपारी १२/०० वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ सुरेश मंडलिक यांनी फिर्याद दिली की, मी तसेच माझे चुलते तुकाराम, चुलती मुक्ता, चुलत भाऊ प्रसाद यांच्यासह नारायणगाव येथे बालाजी ट्रॅक्टर शोरूम येथे आमचे स्वराज कंपनीचे ७२४ ऑर्चिड मिनी ट्रॅक्टरचा व्यवहार क्लिअर करण्यासाठी आलो असता शोरूम चे मालक संतोष भुजबळ याने आधी पैसे भरा मग व्यवहार क्लिअर करू असे सांगितले. त्यावर चुलते तुकाराम यांनी तुम्ही व्यवहार क्लिअर करून देतो म्हणाला होता. त्यावेळी त्यांनी आम्हाला शोरूमच्या बाहेर काढले. आमचे काम करून देत नाही. आम्हाला जा म्हणतो लंगड्या पांगळ्याचे पैसे खाऊ नका चांगल्याचे खा असे म्हणाले असता त्यांना त्याचा राग येऊन संतोष भुजबळ याने तेथे पडलेला लोखंडी पाईप हातात घेतला. त्यामुळे मी मध्ये आलो असता संतोष भुजबळ याने लोखंडी पाईप माझ्या डोक्यात जोरात मारून गंभीर दुखापत केली. तसेच तेथे असलेल्या योगेश भुजबळ याने संतोष भुजबळ याच्या हातातील लोखंडी पाईप घेऊन त्याने माझे पाठीवर, पायावर, हातावर मारहाण करून मला गंभीर दुखापत केली. व माझे चुलते तुकाराम व चुलती मुक्ता यांना धक्काबुक्की करून परत इथे यायचे नाही आला तर मारून टाकीन अशी धमकी देऊन शिवीगाळ दमदाटी केली. म्हणून मंडलिक यांनी भुजबळ यांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे .

वरील फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये,गुन्हा रजिस्टर नं. ३१७/२०२० भा.द.वि.कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४,५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार कैलास ढमाले करीत आहेत.

Previous articleखेड तालुका मनसेच्या वतीने राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशचा “कोरोना योद्धा” पुरस्कार देऊन सन्मान
Next articleज्ञानगंगा शिक्षण मंडळाकडून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात स्तुत्य उपक्रम -जि.प.सदस्या कीर्ती कांचन