खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठान’ने उपलब्ध करून दिलेले हायफ्लो ऑक्सिजन युनीट कार्यान्वित

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)
नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जगदंब प्रतिष्ठान’ने उपलब्ध करून दिलेले हायफ्लो नोजल ऑक्सिजन युनीट आज कार्यान्वित करण्यात आले.

जुन्नर तालुक्यात कोविड – १९ बाधितांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडची नितांत गरज भासत आहे. अनेकदा रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवावे लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘जगदंब प्रतिष्ठान’ या त्यांच्या समाजसेवी संस्थेच्यावतीने नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाला हायफ्लो नोजल ऑक्सिजन युनीट प्रदान करण्यात आले होते. या युनीटचा संच बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णाला जोडून कार्यान्वित करण्यात आला.

या प्रसंगी नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. योगेश आगम, एॅक्युअर कंपनीचे प्रतिनिधी नरेश लवंगारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश ससाणे, डॉ. अभिजित काळे, डॉ. पद्मावती, श्रेयस झोडगे व तुषार डोके उपस्थित होते.