आत्मा व अमृत ऊस उत्पादकांचे नवे तंत्र जाणून घेण्यासाठी शिवार फेरीचे आयोजन

दिनेश पवार, दौंड

दौंड तालुक्यातील देऊळगावराजे येथे प्रगतशील शेतकरी माऊली कापसे यांच्या शेतावर कृषी विभागाच्या आत्मा व ऊस अमृत ऊस उत्पादक शेतकरी ग्रुप यांच्या समन्वयाने शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

या शिवरफेरीमध्ये राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शेतकरी संदीप घोले यांनी शेतकरी बंधावना ऊस पिकाबाबत मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकरी बाधवांच ऊस पिकाबाबत मध्यंतरी ऊस पिक म्हणजे आळशी शेतकऱ्याचं पिक आहे असा विचार समाजामध्ये रूढ होत चालला होता. पण याला फाटा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ग्रुपमधील प्रमुख संदीप घोले व त्यांचे सहकारी शेतकरी बांधव यांनी चालु केला. यांच्या संकल्पनेतून ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी ऊस लागवड करन्यापूर्वीपासूनचे सर्व नियोजन त्यामध्ये शेतजमिनीची मशागत , बेसल डोस, लागवडीचे अंतर, सुपरकेन नर्सरी, विवध प्रकारच्या आळवण्या व फवारण्या याचे अचूक वेळापत्रक , बाळ बांधणी, फुटव्याची संख्या, मोठी बांधणी, आंतरमशागत, खते व किटकनाशके यांचे योग्य व्यवस्थापन याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन केले. मध्यंतरी कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या शेतावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता त्यातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्यास मदत झाली.

ऊस पिकामध्ये आपण राबराब राबत असतो ,सोबत खर्च पण करत असतो परंतु शेवटी आपल्या पदरी निराशाच येते अपेक्षित उत्पादन येत नाही आणि हताश होऊन आपण ऊसशेती परवडत नाही अशी धारणा करून घेतो. असे न करता आपल्याला काहीतरी बदल केला पाहिजे या विचाराने श्री संदीप घोले सरांनी स्वतः 3 वर्ष किटची ट्रायल घेतली. यामध्ये लागवडी नंतरच्या २ आळवणी व 3 फवारणी चे घटक अंतर्भूत केले आहेत. बाजारातील या किटची किंमत 5000 ते 6000 रुपये आहे परंतु त्यांनी व सहकाऱ्यांनी आपण समाजाचे काही ना काही देणं लागतो या प्रामाणिक भावनेतून ना नफा ना तोटा या तत्वावर ते अवघ्या 2300/- रुपयांमध्ये उपलब्ध करून दिले आहे. आज शिवारफेरीच्या निमित्ताने किटचे अनावरण करण्यात आले.

यावेळी आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांनी आत्मा योजनेमधील गट शेती ,त्यामधील शेतकऱ्यांना होणारे फायदे, विकेल ते पिकेल या योजनेबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्र बारामतीचे अनिल काळोखे यांनी जैविक खते, कीटकनाशके, विवध प्रकारचे सापळे याबाबत मार्गदर्शन केले. दौंड शुगरचे ऊस विकास अधिकारी श्री बेनके साहेब यांनी ऊस पिकाच्या संख्येबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी मित्र प्रशांत वाबळे,महादेव सुरीवशी, शाहजी वाघमोरे,केलास गिरमकर
यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली कापसे यांनी केले तर आभार गणेश कापसे यांनी मानले.

Previous articleडॉ. मदन कोठुळे यांनी शिक्षकांना मास्क व सॅनिटीझरचे केले वाटप
Next articleखासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठान’ने उपलब्ध करून दिलेले हायफ्लो ऑक्सिजन युनीट कार्यान्वित