सर्व प्रकारच्या कलावंतांसाठी विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे – आमदार अतुल बेनके यांची मागणी

नारायणगाव (किरण वाजगे)

कोरोणा विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध क्षेत्रात काम करणारे कलावंत, कलाकार, तमाशा कलाकार, लोककलावंत, पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याची झळ पुढील अनेक महिने या सर्व प्रकारच्या कलाकारांना बसणार असल्याने या कलाकारांना कायमस्वरूपी मदत होईल यासाठी आपण शासनाकडे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे भरीव मदत करण्याची मागणी केली आहे .अशा सर्व प्रकारच्या कलावंतांच्या मदतीसाठी व आर्थिक उन्नतीसाठी विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी केली असल्याचे आमदार अतुल बेनके यांची आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. नारायणगाव येथील कुकडी धरण प्रकल्पाच्या विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार बेनके बोलत होते.

याप्रसंगी ज्येष्ठ तमाशा फड मालक रघुवीर खेडकर, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, बाजार समितीचे संचालक शिरीष बोऱ्हाडे, मालती इनामदार नारायणगावकर, शफीभाई शेख, संभाजी जाधव, विशाल मुसाभाई इनामदार, कैलास नारायणगावकर, राजू बागुल तसेच तमाशा व्यवस्थापक व कलावंत उपस्थित होते.

तमाशा बरोबरच इतर सर्व प्रकारच्या कलावंतांसाठी आपण शासनाकडे विविध मागण्या केल्या असल्याचे शरद कला क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मिकांत खाबिया यांनी सांगितले.यावेळी महाराष्ट्र राज्य तमाशा कलावंत विकास मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ तमाशा फडमालक रघुवीर खेडकर यांनीदेखील शासनाकडे कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा केला असल्याचे सांगितले.

Previous articleप्रहार जनशक्ती पक्षाच्या दौंड तालुका विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी सुमित निंबाळकर यांची निवड
Next articleकोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणा-या रुग्णालयांनी जादा दर आकारल्यास कारवाई — उपमुख्यमंत्री अजित पवार